Join us

सहकारी संस्थांना लेखा परीक्षण अहवालासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 7:16 AM

co-operative societies : संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी, यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थेचे २०१९-२० या कालावधीचे लेखा परीक्षण अहवाल दाखल करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवाय २०१९-२० या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी ३१ मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी, यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पूर्व उपनगरे यांच्या कार्यालयांतर्गत घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पवईसह मुलुंड हे पाच विभाग येतात. या पाच विभागांत येणाऱ्या सर्व संस्थांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांना संस्था नोंदणीनंतर ४ महिन्यांच्या आत जमिनीचे मानिव अभिहस्तांतरण करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे सादर करणे शक्यसंस्थांना कायद्यान्वये सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे अभिहस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करता येतील. शिल्लक चटई, पुनर्विकास व क्षेत्रवापरासाठी संस्थेच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे

टॅग्स :मुंबई