Join us

पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीसाठी आज अखेरची मुदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:16 AM

अकरावी प्रवेशाची पहिलीच यादी नव्वदीपार गेली असून, अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीचा आज मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.

मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिलीच यादी नव्वदीपार गेली असून, अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीचा आज मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. पहिल्या यादीत १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या आहेत.या यादीत ९५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या १४८७ इतकी आहे. यातील आयसीसीएई, सीबीएसई, आयजीसीएसई विद्यार्थ्यांना १,१८०; तर राज्य मंडळाच्या ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाला आहे. म्हणजेच ९५ टक्क्यांवरील नामांकित महाविद्यालयातील ७९ टक्के जागांवर इतर मंडळातील विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या आहेत.९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त २० टक्के राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट झाले होते.पहिली यादी लागल्यानंतर या विद्यार्थ्यांनाच त्यांच्या पसंतीच्या नामंकित महाविद्यालयांमध्ये जागाही उपलब्ध झाल्या आहेत. मात्र अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसला असून केवळ ३०० विद्यार्थीच ९५ टक्क्यांवरील जागांवर प्रवेश घेऊ शकणार आहेत.>कोट्यातील जागांवर अद्याप प्रश्नचिन्हचअकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून यंदा विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र पहिली फेरी संपत आली तरी अद्याप मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून कोट्याच्या जागा जाहीर करण्यात आल्या नाहीत. महाविद्यालये आणि संस्थांना इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन या कोट्यातील आपल्याकडे किती जागा आहेत, याची माहिती उपसंचालक कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. तसेच या जागांवर प्रवेश देऊन मग त्या आॅनलाइन अपडेट करणेही बंधनकारक आहे. मात्र मुंबई विभागातील महाविद्यालयांमध्ये या कोट्यातील जागांची संख्या किती आहे याची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात उपसंचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने नेमलेल्या विशेष भरारी पथकांचा उपयोग होणार का, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.