झोपडीधारकांना ३० पर्यंत तक्रारी नोंदविण्यास मुदत
By admin | Published: November 9, 2015 03:11 AM2015-11-09T03:11:03+5:302015-11-09T03:11:03+5:30
धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५ च्या क्लस्टर जे मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची प्र्रारूप यादी म्हाडाने जाहीर केली आहे.
मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५ च्या क्लस्टर जे मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची प्र्रारूप यादी म्हाडाने जाहीर केली आहे. अपात्र आणि प्रकरण प्रलंबित ठेवलेल्या झोपडीधारकांना आपल्या हरकती नोंदविण्यासाठी म्हाडाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अर्जदारांना ३0 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. हरकती नोंदविण्यास मुदतवाढ देण्यापूर्वीच म्हाडाने पात्र-अपात्रतेची अंतिम यादी तयार करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने म्हाडात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणामार्फत सेक्टर १ ते ४ चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर सेक्टर ५च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाने क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगरातील झोपडीधारकांची पात्र, अपात्रतेची प्रारूप यादी जाहीर केली आहे. नवीन मुदतवाढीनुसार
अपात्र झोपडीधारकांना ३0 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. (प्रतिनिधी)