भुयारी मेट्रोतून प्रवास पुढच्या वर्षी; डिसेंबर २०२३ ची डेडलाइन हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:34 AM2023-12-26T09:34:10+5:302023-12-26T09:35:04+5:30

मुंबईतील पहिलीवहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेवरून मुंबईकरांना आता पुढच्या वर्षीच प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

deadline of the metro 3 project december 2023 was missed chief minister inspected the project in mumbai | भुयारी मेट्रोतून प्रवास पुढच्या वर्षी; डिसेंबर २०२३ ची डेडलाइन हुकली

भुयारी मेट्रोतून प्रवास पुढच्या वर्षी; डिसेंबर २०२३ ची डेडलाइन हुकली

मुंबई : मुंबईतील पहिलीवहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेवरून मुंबईकरांना आता पुढच्या वर्षीच प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यात येणार होता; मात्र, दिरंगाईने सुरू असलेल्या कामामुळे मेट्रो ३ च्या कामाची डेडलाइन हुकली आहे. या मेट्रो प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली.'

दक्षिण मुंबईतील कुलाबा ते पश्चिम उपनगरातील अंधेरी सीप्झदरम्यान मेट्रो ३ चालवली जाणार आहे. या मेट्रोचे कारशेड आरे कॉलनी येथे असून, या ३३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मेट्रो ३ प्रशासनाकडून या प्रकल्पाचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करण्यात येणार होता; मात्र, कारशेडचे काम अपूर्ण असल्याने तसेच कारशेडमध्ये दाखल झालेल्या सर्व गाड्यांची चाचणी न झाल्याने मेट्रो ३ ची डेडलाइन हुकली आहे. 

मार्गिकेवर २७ स्थानके :

या मार्गिकेवर २७ स्थानके आहेत. मेट्रो ३ मार्गावरील आचार्य अत्रे चौक या स्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. प्रदूषण टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे व प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: deadline of the metro 3 project december 2023 was missed chief minister inspected the project in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.