मुंबई : ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’साठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
या आधी २४ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर, २९ जुलैपर्यंत ती वाढविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना येणाºया तांत्रिक अडचणी विचारात घेता, त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुन्हा दोन दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकºयांचे विमा अर्ज बँक आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. शेतकºयांनी याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.