Join us

गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:08 AM

‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील रायगड जिल्ह्यातील मौजे कोन, तालुका पनवेल येथील सदनिकांच्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/वारसांना पात्रता सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी यापूर्वी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत व त्यानंतर ९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला रेंटल हाउसिंग स्कीमद्वारे मौजे कोन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील प्राप्त २४१७ सदनिकांची मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे डिसेंबर २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या संगणकीय सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या ३९५ गिरणी कामगार/वारसांना पात्रता सिद्ध करण्याकरिता विहित कागदपत्रे कोटक महिंद्रा बँकेत सादर करण्यासाठी १८ डिसेंबर २०१७ पासून १७ जानेवारी २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळातर्फे घेण्यात आला आहे.‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील रायगड जिल्ह्यातील मौजे कोन, तालुका पनवेल येथील सदनिकांच्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/वारसांना पात्रता सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी यापूर्वी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत व त्यानंतर ९ नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, चुकीचे पत्ते यासारख्या विविध कारणांमुळे एकूण १४९ गिरणी कामगारांची ‘प्रथम सूचनापत्रे’ कार्यालयात परत आलेली आहेत. अशा गिरणी कामगार/वारसांची यादीही म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.मुंबई मंडळातर्फे २ डिसेंबर २०१६ रोजीच्या गिरणी कामगारांच्या सोडतीमधील ज्या यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचनापत्रे मिळाली नाहीत, त्यांनी म्हाडा कार्यालयात कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथे योग्य त्या पुराव्यासह उपस्थित राहून व ओळख पटवून प्रथम सूचनापत्र प्राप्त करून घ्यायचे आहे.संपर्क साधण्याचे आवाहनगिरणी कामगार किंवा वारसांना कोणतीही शंका असल्यास हेल्पलाइन क्रमांक ९८६९९८८००० व ०२२-६६४०५०४१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीत गिरणी कामगार, वारसांनीकोटक महिंद्रा बँकेच्या हॉलमार्क प्लाझा, कलानगर, वांद्रे (पूर्व) या शाखेत बँकेच्या कार्यालयीन दिवशी कागदपत्रे सादर करावी लागतील. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास, सोडतीतील यशस्वी अर्जदाराचा अर्ज रद्द ठरवून प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगार/वारस यांना संधी देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई