Join us

रस्ते कामांना १५ मेपर्यंतची डेडलाइन

By admin | Published: March 11, 2017 3:04 AM

वारंवार दुरुस्ती व खोदकाम टाळण्यासाठी दरवर्षी रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतले. त्यादृष्टीने कामेही सुरू झाली, मात्र ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे

मुंबई : वारंवार दुरुस्ती व खोदकाम टाळण्यासाठी दरवर्षी रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतले. त्यादृष्टीने कामेही सुरू झाली, मात्र ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामुळे या कामाचा तातडीने आढावा घेऊन १५ मेपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मुदत आयुक्त अजय मेहता यांनी रस्ते विभागाला दिली आहे.अजय मेहता यांनी एका विशेष बैठकीत रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. सलग तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे, उपायुक्त व सर्व २४ प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त उपस्थित होते. यामध्ये पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ५५८ प्रकल्प रस्त्यांच्या कामांची माहिती घेण्यात आली. दुसऱ्या यादीतील रस्त्यांच्या कामांबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यादेश काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात ही कामे सुरू राहिल्यास मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहेत रस्त्यांची कामे : रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणाऱ्या दोन याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत ९४ तर दुसऱ्या यादीत ९३८ रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. याप्रमाणे एकूण एक हजार ३२ रस्त्यांचे रिफ्रेसिंग होणार आहे. यापैकी पहिल्या यादीतील ९४ रस्त्यांपैकी १४ रस्त्यांच्या रिफे्रसिंगची कामे पूर्ण झाली असून, ३० रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याची ताकीद आयुक्तांनी दिली आहे.