वेगाची नशा ठरतेय जीवघेणी
By admin | Published: July 22, 2014 01:09 AM2014-07-22T01:09:09+5:302014-07-22T01:09:09+5:30
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी परिसरात वाहन अपघातांच्या संख्येत झालेली वाढ ही येथील रहिवाशांच्या आणि पोलिसांच्याही चिंतेचे कारण झाले आहे.
Next
मनीषा म्हात्रे - मुंबई
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी परिसरात वाहन अपघातांच्या संख्येत झालेली वाढ ही येथील रहिवाशांच्या आणि पोलिसांच्याही चिंतेचे कारण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये येथे 3क् हून अधिक अपघातांची नोंद झाली असून नुकत्याच सुरू झालेल्या ईस्टर्न फ्री वे मार्गामुळे यात आणखी भर पडेल काय, या भीतीने पोलीस धास्तावले आहेत.
ईस्टर्न फ्री वे हा पूर्व द्रुतगती महामार्गाला घाटकोपरला येथे मिळतो. त्यापुढे घाटकोपर वाहतूक चौकी सोडल्यानंतर ऐरोली ब्रिज जंक्शनर्पयत हा रस्ता सरळ रेषेत असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग सुसाट असतो. त्यात विनासिग्नल प्रवासासाठी विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथील उड्डाणपुलांचा वापर करण्याच्या नादात वाहनचालक रस्त्यावरील लेन हाय स्पीडमध्येच बदलतात. परिणामी वेगावर नियंत्रण न राहिल्याने सतत अपघात होत असल्याचे वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील गोदरेज कंपनीचे दोन्ही प्रवेशद्वार, कन्नमवार नगर, ऐरोली जंक्शन, मुलुंड तरण तलाव या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अपघात होताना दिसतात. गेल्या सहा महिन्यांत सुसाट वेगाने वाहन चालवून झालेल्या 3क् हून अधिक अपघातांची नोंद विक्रोळी पोलीस ठाण्यात झाली आहे. तसेच दिवसाला किमान एक तरी किरकोळ अपघाताचा कॉल असून आठवडय़ात एकाचा मृत्यू असे चक्र सध्या या द्रुतगती महामहामार्गावर निर्माण झाले आहे.
या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. 21 ऑक्टोबर 2क्13 रोजी ईस्टर्न फ्री वे वर दोन कॉलेज तरुणांचा भरधाव वेगामुळे तोल जात अपघात झाला होता. त्यात दोघांनी आपले प्राण गमावले होते. रहिम अघा (25), रमजान शेख (23) अशी मृत तरुणांची नावे आहेत तर आज दुपारच्या सुमारास ईस्टर्न फ्री वे वरून जात असताना एक 39 वर्षीय कारचालक जखमी झाल्याची घटना घडली असून तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
च्वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ईस्टर्न फ्री वे वर हायस्पीड कॅमेरे बसविण्याची आवश्यकता होती. ते बसविण्यात आले नसल्याने आता हायस्पीड कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहनचालकांनी आपल्या जीवाची काळजी घेत वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघातांवर नियंत्रण ठेवणो शक्य होईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) कैसर खालिद यांनी सांगितले.
च्अपघात रोखण्यास उपाययोजना होणो गरजेचे आहे. त्याचसोबत अपघातानंतर जखमींना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घाटकोपर ते ऐरोली जंक्शन या पट्टय़ात दोन्ही मार्गिकांवर किमान दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची गरज आहे. तसे पत्रही वरिष्ठांना पाठवल्याचे विक्रोळी साहाय्यक पोलीस आयुक्त, रामदास गायकवाड यांनी सांगितले.