Anil Deshmukh "परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:51 AM2024-08-05T11:51:08+5:302024-08-05T11:55:54+5:30

काल फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना डिवचलं होतं.

Deal of Parambir Singh and devendra Fadnavis Chandiwal report before public Answer by Anil Deshmukh | Anil Deshmukh "परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

Anil Deshmukh "परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना डिवचलं होतं. चांदिवाल अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता तेव्हा कारवाई का केली नाही?, असा सवाल त्यांनी केला. यावर आता अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

उप राज्यपाल दिल्ली महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा आपला दणका

"चांदिवाल आयोगाचा अहवाल आमच सरकार असताना आला होता. पण, काही दिवसातच आमचं सरकार पडलं. त्यामुळे तो अहवाल आमचं सरकार जाहीर करु शकलं नाही. आता त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे ४० आमदार त्यावेळी ५०-५० कोटी रुपये देऊन फोडले.त्यामुळे ते सरकार त्यावेळी पडले, त्यामुळे तो अहवाल समोर आला नाही. आता दोन वर्षापासून त्यांचं सरकार आहे. तो अहवाल होम डिपार्टमेंटला आहे. १४०० पानांचा अहवाल त्यांनी जनतेसमोर आणावा ही माझी विनंती आहे, असं प्रत्युत्तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. 

"माझ्यावर त्यावेळी जे आरोप करण्यात आले होते, त्यात काय होतं हे जनतेसमोर यायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनी काल आणखी एक खोट सांगितलं. फडणवीस यांना चांगलं माहित आहे की, मी ज्यावेळी गृहमंत्री होतो त्यावेळी अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यावेळी एनआयए परमबीर सिंह यांना अटक करणार होते. त्यावेळी परमबीर सिंह आणि फडणवीस यांच्यात बोलण झालं. ते फडणवीस यांना शरण गेले. त्यावेळी त्यांनी परमबीरसोबत माझ्यावर आरोप करण्याबाबत डिल केली, म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, असा आरोपही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.   

देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चांदिवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळात हा सुपूर्द झाला होता. महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही? याचे उत्तर दिले गेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे काय तर परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त महाविकास आघाडीने केले. सचिन वाझेलाही त्यांनीच नोकरीवर घेतले. अनिल देशमुख स्वत: गृहमंत्री असताना परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर आरोप लावले. विद्यमान गृहमंत्र्यावर एखादा पोलीस आयुक्त आरोप लावेल असे कधी शक्य आहे का? त्याला त्याच्या नोकरीची काळजी आहे की नाही असं सांगत फडणवीसांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले. 

Web Title: Deal of Parambir Singh and devendra Fadnavis Chandiwal report before public Answer by Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.