Join us

विनयभंगाच्या गुन्ह्यातील डॉक्टर झाला डीन, ठाणे पालिका प्रशासनाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:18 AM

दीड महिन्यांची कोठडी आणि सुमारे चार वर्षे निलंबनाची कारवाई झालेल्या शैलेश्वर यांना काही महिन्यांपूर्वी पालिकेने पुन्हा सेवेत रुजू करून घेतले.

- संदीप शिंदेमुंबई : तब्बल ३० विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या डॉ. शैलेश्वर नटराजन यांची राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन (अतिरिक्त कारभार) पदावर वर्णी लावण्याचा प्रताप ठाणे पालिका प्रशासनाने केला आहे. दीड महिन्यांची कोठडी आणि सुमारे चार वर्षे निलंबनाची कारवाई झालेल्या शैलेश्वर यांना काही महिन्यांपूर्वी पालिकेने पुन्हा सेवेत रुजू करून घेतले. मात्र, आता त्यांच्याकडे थेट डीन पद सोपवल्याने महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.शैलेश्वर हे ठाणे पालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख या पदावर कार्यरत होते. लेक्चरदरम्यान शरीरशास्त्र शिकविण्याच्या बहाण्याने शैलेश्वर अश्लिल चाळे करतात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी तत्कालीन डीन च्योएटी मैत्रा यांच्याकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने या विद्याथर््िानींनी एप्रिल २०१४ मध्ये तत्कालीन पालिका आणि पोलिस आयुक्तांकडे ई- मेलव्दारे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली. ३० विद्यार्थ्यांनी चौकशी समितीसमोर आॅन कॅमेरा जबाब नोंदविले. त्यानंतरही शैलेश्वर यांच्यावर कारवाई होत नव्हती. त्यानंतर तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हस्तक्षेप केल्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली शैलेश्वर यांनी कळवा पोलिसांनी अटक केली. सुरवातीला पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी असे सव्वा महिना ते गजाआड होते. या गुन्ह्यानंतर पालिकेने त्यांना सेवेतून निलंबित केले. दरम्यानच्या काळात कळवा पोलिसांनी शैलेश्वर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. या काळात शैलेश्वर निलंबन रद्द करण्यासाठी धडपडत होते. काही महिन्यांपूर्वी पालिकेने निलंबन रद्द करून त्यांना सेवेत घेतले. त्यांच्याकडे पुन्हा शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या डीन संध्या खडसे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पालिकेने त्या पदाची सूत्रे शैलेश्वर यांच्याकडे सोपवली. त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्यांच्या हाती प्रमुखपदाची सूत्रे आल्यानंतर महाविद्यालयात विशेषत: महिलांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनी शैलेश्वर यांच्याच हस्ते महाविद्यालयात ध्वजारोहण झाले. त्यामुळे संतप्त विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांनी या सोहळ्यावर अघोषित बहिष्कार टाकल्याची माहिती महाविद्यालयातील सूत्रांनी दिली.शैलेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची कसून चौकशी झाली होती. पीडित विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवण्यात आले होते. त्या आधारावर शैलेश्वर यांच्या विरोधातील आरोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल केले आहे. त्यात शैलेश्वर यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाने बोलावलेले नाही.- रवीकांत मालेकर, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळवा पोलिस स्टेशनपालिकेने अधिकारी किंवा कर्मचाºयाचे निलंबन केल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत सरकारची नियमावली सुस्पष्ट आहे. त्याचा आधार घेत शैलेश्वर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. एकदा कामावर रूजू करून घेतल्यानंतर त्यांना डीन पदाचा अतिरिक्त कारभार सोपविणे अयोग्य नाही. कायमस्वरूपी डीन नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.- ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, आस्थापना, ठाणे महापालिका

टॅग्स :डॉक्टर