Raj Thackeray: प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 02:09 PM2022-10-17T14:09:30+5:302022-10-17T14:10:19+5:30

राज ठाकरें यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती.

Dear friend Devendraji, you responded; Raj Thackeray's letter again for BJP on by election of andheri east | Raj Thackeray: प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

Raj Thackeray: प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

Next

मुंबई - अखेर वेस्ट विधानसभा पोट निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. याबाबत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज आपण परत घेत आहे. लटके निवडून याव्यात यासाठी अर्ज परत घेत आहोत, असेही बावनकुळे यांनी म्हटले. त्यानंतर, भाजप-मनसे युतीवरही स्पष्टीकरण दिलं आहे. आता, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून पत्र लिहून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत. 

राज ठाकरें यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. त्यानंतर, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजपने उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीसह मनसेकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

प्रिय मित्र देवेंद्रजी, जय महाराष्ट्र... 
काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. 
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार

राज ठाकरे राज्याच्या हिताची भूमिका घेतात - बावनकुळे

अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपनेही निर्णय घेतल्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा आणखी घट्ट झाल्या आहेत. मात्र, त्यावर, बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात. मात्र, भाजपचा हा निर्णय म्हणजे मनसे-भाजपच्या युतीची नांदी नाही. राज ठाकरे व शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा वेगळा भाग होता. शीर्षस्थ नेतृत्वाने हा निर्णय घेतला. अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे. आम्ही कुठलीही पळपुटी भूमिका घेतलेली नाही. २०२४ मध्ये आम्ही येथे लढू आणि जिंकू, असे बावनकुळे यांनी म्हटले.

Web Title: Dear friend Devendraji, you responded; Raj Thackeray's letter again for BJP on by election of andheri east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.