'प्रिय वरळीकरांनो', आदित्य ठाकरेंची भावनिक साद; गद्दारी म्हणत शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:45 PM2022-11-21T16:45:09+5:302022-11-21T16:46:57+5:30

'महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत.

Dear Worlikars, Aditya Thackeray's Emotional Saad letter to people; Targeting the rulers bjp and eknath shinde as traitors | 'प्रिय वरळीकरांनो', आदित्य ठाकरेंची भावनिक साद; गद्दारी म्हणत शिंदे गटावर निशाणा

'प्रिय वरळीकरांनो', आदित्य ठाकरेंची भावनिक साद; गद्दारी म्हणत शिंदे गटावर निशाणा

googlenewsNext

मुंबई - शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे गेल्या ४ महिन्यांपासून शिवसेनेत आक्रमक बनून पुढे येत आहेत. आपल्या भाषणात शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर ते जोरदार निशाणा साधत आहेत. त्यासोबतच, पत्रकार परिषद आणि पत्रकारांसमोर येताना महत्त्वाचे मुद्दे घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना सातत्याने गद्दार म्हणत आदित्य ठाकरे लक्ष्य करत आहेत. त्यामुळे, ते चांगलेच चर्चेत आहेत. आता, आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी आदित्य यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. तसेच, गेल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात आपण वरळीचा चांगला विकास केल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

'महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+' चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत, असे आदित्य यांनी पत्राच्या पहिल्याच पॅरामध्ये म्हटले आहे. 

नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत. म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटतंय, असंही आदित्य यांनी पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील, अशी भावनिक सादही आदित्य यांनी वरळीकरांना पत्राच्या माध्यमातून घातली आहे.

Web Title: Dear Worlikars, Aditya Thackeray's Emotional Saad letter to people; Targeting the rulers bjp and eknath shinde as traitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.