बसंती वाघिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:13+5:302021-06-26T04:06:13+5:30
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बसंती या वाघिणीचा शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तिचे वय २१ ...
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बसंती या वाघिणीचा शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तिचे वय २१ होते. मुंबई पशु महाविद्यालय येथील डॉक्टर गाढवे, डॉक्टर मनीष पिंगळे आणि त्यांचे सहकारी यांनी शवविच्छेदन केले असून, उद्यानातील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यप्रदेश मधील भोपाळ येथील प्राणी संग्रहालयातून ७ एप्रिल २००६ रोजी बसंतीला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. तिने चार पिल्ले दिली होती. यातील तीन पिल्लांचा कॅन्सरने मृत्यू झाला. एक जिंवत असून, तिचे नाव लक्ष्मी आहे. बसंती दोन वर्षांपासून आजारी होती. तिला चालता येत नव्हते. त्यामुळे पर्यटकांनाही तिचे दर्शन देणे बंद करण्यात आले होते. मृत्यूसमयी तिला वृद्धापकाळाची लक्षणे दिसत होती, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन अधिकारी विजय बारब्दे यांनी दिली.