लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू

By admin | Published: September 30, 2014 02:46 AM2014-09-30T02:46:17+5:302014-09-30T02:46:17+5:30

धावत्या लोकलमधून हात सटकून पडणा:या मित्रला वाचवण्याचा प्रयत्न दोघा मित्रंनी केला, मात्र त्यात अपयशी ठरल्याने त्यापैकी दोघांना जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला.

The death of both of them fell from the locality | लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू

लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू

Next
>करी रोडजवळील अपघात : मित्रला वाचवताना गमावला जीव
मुंबई : धावत्या लोकलमधून हात सटकून पडणा:या मित्रला वाचवण्याचा प्रयत्न दोघा मित्रंनी केला, मात्र त्यात अपयशी ठरल्याने त्यापैकी दोघांना जीव गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला. करी रोड ते परेल रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सायंकाळी हा विचित्र अपघात झाला. 
शुभम महाजन (19), नेहल सरोदे (21) आणि पवन सकपाळ (24) हे डोंबिवलीत राहणारे तरुण लोअर परेल रेल्वे कारखान्यात सहा महिन्यांपासून काम करीत होते. नेहमीप्रमाणो सायंकाळी कारखान्यातून निघाल्यावर ते रेल्वे कर्मचा:यांसाठी असलेली लोकल पकडण्यास परेल येथून करी रोड स्थानकात आले. तेथून सायंकाळी पावणो पाचला सुटलेल्या कुर्ला लोकलने दरवाजाजवळ उभे राहून ते प्रवास करीत होते. तेव्हा पवनचा हात सुटला. तो पडत असल्याचे दिसताच शुभम व नेहलने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचाही तोल गेला व ते तिघे रुळावर पडले. यात पवनचा जागीच मृत्यू झाला, असे पोलीस उपनिरीक्षक जी.एन. घंगाळे यांनी सांगितले.
 
तिघेही जळगाव जिल्ह्यातील
नेहलचे दोन्ही पाय कापले गेले होते आणि शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दोघांनाही उपचारासाठी तत्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पाय गमावलेल्या नेहल सरोदेचा रात्री मृत्यू झाला. हे तिघेही जळगाव जिल्ह्यातील आहेत. 

Web Title: The death of both of them fell from the locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.