Join us

कबरीतून काढला दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 6:08 AM

आरेमध्ये बलात्कार झाल्यानंतर, विष पिऊन आत्महत्या करणाºया मुलाचा मृतदेह मंगळवारी कबरीतून काढण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : आरेमध्ये बलात्कार झाल्यानंतर, विष पिऊन आत्महत्या करणाºया मुलाचा मृतदेह मंगळवारी कबरीतून काढण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अत्यंत गुप्तता बाळगत हा मृतदेह पोलिसांनी जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याचीही माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.आरेत ज्या दोन मुलांवर बलात्कार झाला, त्यातील दहा वर्षांच्या आसिफ (नावात बदल)चा १३ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर, साकीनाक्यातील एका खासगी डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेऊन, आसिफचे शव विहार लेकजवळील चाँद शाह बाबा कबरस्तानात दफन करण्यात आले. आपल्याप्रमाणे त्याच्यावरही अनैसर्गिक बलात्कार झाल्याचे मंगळवारी केईम रुग्णालयात मृत्यू झालेल्या सुनील (नावात बदल) ने त्याच्या पालकांना सांगितले होते. मात्र, आसिफच्या घरच्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याने, त्यांनी अजून तक्रार दाखल केलेली नाही. आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करत, मंगळवारी आसिफचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात कबरस्तानातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. यावेळी त्याचे वडीलही हजर होते. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले, ते दुपारी दीडच्या सुमारास पूर्ण झाल्याचे या अधिकाºयाने सांगितले. त्याचा मृत्यू कसा झाला? त्याच्यावर अत्याचार झाले होते का, याचे उत्तर शवविच्छेदन अहवालातून मिळेल. त्यानुसार, पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.सुनील आणि आसिफसोबत त्यांच्याच वयाचा अजून एक मित्र असायचा. हा प्रकार घडला, तेव्हा तो उत्तर प्रदेश या त्याच्या गावी गेला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातून त्याला घेऊन मुंबईकडे निघाले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुनीलने आईला सांगितल्याप्रमाणे कोणीतरी ‘मुरारजी का लाडका’ त्याला त्या माणसाकडे घेऊन गेला होता ज्याने त्याच्यावर अत्याचार केले.