विक्रोळीत स्कूलबसखाली चिमुरडय़ाचा मृत्यू
By admin | Published: November 12, 2014 02:47 AM2014-11-12T02:47:56+5:302014-11-12T02:47:56+5:30
खासगी स्कूलबसच्या धडकेत एका 12वर्षीय चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विक्रोळीत घडली. ़पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
Next
मुंबई : खासगी स्कूलबसच्या धडकेत एका 12वर्षीय चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विक्रोळीत घडली. ़पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
विक्रोळीत कन्नमवारनगर येथे राहणारा आणि सातवीत शिकणारा असीम सलीम शेख हा नेहमीप्रमाणो मंगळवारी सायंकाळी सायकल फिरवण्यास घराबाहेर पडला होता. तासाभराने साडेसहाच्या सुमारास तो घरी परतत होता. दरम्यान, येथील महात्मा फुले रुग्णालयाकडून वळण घेत भरधाव वेगात स्कूलबस आली. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि त्याने असीमला जोराची धडक दिली. बसचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.