उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीचा मृत्यू; हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:35 AM2017-09-12T10:35:23+5:302017-09-12T10:40:56+5:30

ताप येत असल्याने मीरा भार्इंदर महापालिकेच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे.

Death of daughter lodged with the hospital for treatment; The hospital alleged to be defamatory | उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीचा मृत्यू; हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा आरोप

उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीचा मृत्यू; हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा आरोप

Next
ठळक मुद्देताप येत असल्याने मीरा भार्इंदर महापालिकेच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

- धीरज परब 

मीरा रोड, दि.12 - ताप येत असल्याने मीरा भार्इंदर महापालिकेच्या पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. उपचारासाठी डॉक्टरच नसल्याने पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. 

भार्इंदर पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राहणारी वैशाली दगडु डुमरे (१७) ही १२ वीची विद्यार्थीनी होती. ती सध्या नाशिकच्या मालेगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. गणपतीच्या सुट्टी निमीत्त ती आपल्या घरी आली होती. तीला ताप असल्याने आई - वडिलांनी तीला सोमवारी सकाळी ९ वाजता उपचारासाठी पालिकेच्या जोशी ( टेंबा ) रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर त्या मुलीला साडे दहाच्या सुमारास रुग्णालयात अॅडमीट करण्यात आलं. पण तीला असह्य वेदना सुरु होऊन नाक व घशातुन रक्तस्त्राव सुरु झाला. रुग्णालयाच्या रात्री ९च्या वैद्यकिय चिठ्ठीनुसार तसे नमुद असुन तीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. तीच्या प्लेटलेट्स ३६ हजार इतक्या होत्या.

कांदिवलीला नेई पर्यंत उशीर होईल म्हणून वैशालीला नजिकच्या कस्तुरी या खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. तीला पुन्हा जोशी रुग्णालयात आणलं असता तेथे डॉक्टरांनी शेवटचा प्रयत्न करुन पाहिला. पण वैशालीचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच वैशालीच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, डॉ. सुशील अग्रवाल, जयेश भोईर आदी नगरसेवकांनी सुध्दा रुग्णालय गाठले. पालिका व डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे वैशालाचा बळी गेल्याचा आरोप यावेळी तिच्या कुटुंबीयांनी केला. पालिकेचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव सह अन्य डॉक्टर देखील रुग्णालयात दाखल झाले. तणाव वाढु लागल्याने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला.
वैशालीच्या वडिलांनी रुग्णालयातील तक्रार वहित, मुलीला सकाळी दाखल केल्या पासुन एकही डॉक्टरने तपासणी केली नाही. परिचारीकेनेच सलाईन लावले व त्यांनीच उपचार केल्याची तक्रार नोंदवली आहे. तीला जास्त वेदना होत असताना देखील दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व बेजबाबदारपणा मुळेच आपल्या मुलीला जीव गमवावा लागला असे डामरे यांनी म्हटले आहे.
रुग्णालयाने भार्इंदर पोलिसांना कळवलेल्या माहिती मध्ये वैशालीच्या मृत्युचे कारण ताप पियुओ असल्याचे नमुद केले आहे. वैशालीच्या नातलगांनी टेंबा येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्या नुसार तीचा मृतदेह जेजेला पाठवण्यात आला आहे. वैशालीच्या नातलगांनी भार्इंदर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर भार्इंदर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन शवविच्छेदनाच्या अहवाला नंतर पुढिल आवश्यक कार्यवाही केली जाईल असे पोलिस सुत्रांनी सांगीतले.
उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रात्री उशीरा आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दुरध्वनी करुन घटने बद्दल संताप व्यक्त करत मृत्युस कारणीभुत ठरलेल्या बेजबाबदारां वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासह निलंबित करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या रुग्णालयात कोणताही हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. 
 वैशाली वर उपचार करण्यासह तीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पालाकांच्या भावना आम्ही समजु शकतो.
डॉ. प्रकाश जाधव, प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी, मनपा

रुग्णालय सुरु केले हे केवळ लोकांची दिशाभुल करण्या पुरतेच आहे. येथे आजही कायम चांगले डॉक्टर व अत्यावश्यक उपचार आणि सुविधा नसल्याने वैशालीचा बळी गेला आहे. या आधी देखील असे प्रकार घडले आहेत.
रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक. 
 

Web Title: Death of daughter lodged with the hospital for treatment; The hospital alleged to be defamatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.