आठव्या मजल्यावरून पडून मद्यपीचा मृत्यू

By admin | Published: May 3, 2016 01:18 AM2016-05-03T01:18:53+5:302016-05-03T01:18:53+5:30

अंधेरी येथील न्यू म्हाडा कॉम्पलेक्सच्या आठव्या मजल्यावरून कोसळून नितीन नायर (३५) या इस्टेट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. वर्सोवा पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती

Death of drunkenness falls from the eighth floor | आठव्या मजल्यावरून पडून मद्यपीचा मृत्यू

आठव्या मजल्यावरून पडून मद्यपीचा मृत्यू

Next

मुंबई : अंधेरी येथील न्यू म्हाडा कॉम्पलेक्सच्या आठव्या मजल्यावरून कोसळून नितीन नायर (३५) या इस्टेट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. वर्सोवा पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू केली असून, अधिक तपास सुरू आहे.
नितीन नायर हा न्यू म्हाडा कॉम्प्लेक्सच्या आठव्या मजल्यावर वास्तव्य करत होता. शनिवारी मद्याच्या नशेत घरी जात असताना त्याने रस्त्यावर एका मुलीसोबत अशोभनीय वक्तव्य केले होते. मुलीने आरडाओरडा सुरू करताच स्थानिकांनी नायरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पळ काढत घर गाठले. स्थानिकांनीही त्याचा पाठलाग करत त्याला गाठले. मात्र काही वेळाने स्थानिक इमारतीच्या खाली उतरले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी नायर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडला. दरम्यान, नायर हा प्रमाणाबाहेर मद्य प्यायला होता. त्या नशेतच तो खाली पडला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Death of drunkenness falls from the eighth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.