मुंबई : अंधेरी येथील न्यू म्हाडा कॉम्पलेक्सच्या आठव्या मजल्यावरून कोसळून नितीन नायर (३५) या इस्टेट एजंटचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. वर्सोवा पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू केली असून, अधिक तपास सुरू आहे.नितीन नायर हा न्यू म्हाडा कॉम्प्लेक्सच्या आठव्या मजल्यावर वास्तव्य करत होता. शनिवारी मद्याच्या नशेत घरी जात असताना त्याने रस्त्यावर एका मुलीसोबत अशोभनीय वक्तव्य केले होते. मुलीने आरडाओरडा सुरू करताच स्थानिकांनी नायरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पळ काढत घर गाठले. स्थानिकांनीही त्याचा पाठलाग करत त्याला गाठले. मात्र काही वेळाने स्थानिक इमारतीच्या खाली उतरले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी नायर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडला. दरम्यान, नायर हा प्रमाणाबाहेर मद्य प्यायला होता. त्या नशेतच तो खाली पडला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आठव्या मजल्यावरून पडून मद्यपीचा मृत्यू
By admin | Published: May 03, 2016 1:18 AM