मुंबई - मस्जिद बंदर येथील आग लागलेल्या सैय्यद मंजिल इमारतीचे पाडकाम असताना २ मजूर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झाले. दोन्ही जखमी मजुरांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले असून त्यापैकी एका मजुराचा मृत्यू झाला आहे. मृत मजुराचे नाव फरीद खान (४५) असं आहे. ३ ऑगस्ट रोजी नागदेवी क्रॉस लेनवरील सैय्यद इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीचे आज पाडकाम सुरु असताना इमारतीचा काही भाग कोसळला असता ५ जण अडकले होते. त्यापैकी ३ जण सुखरूप बाहेर पडले तर दोघांना डोक्याला दुखापत झाल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जखमी मजुराचं नाव अब्दुल शेख (२४) असं आहे.
मस्जिद बंदर येथील एका दुकानाला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अग्निशमन दलाचा एक अधिकारी धुरामुळे घुसमटून जखमी झाला होते. आज आगीत खाक झालेल्या इमारतीचे पाडकाम सुरु असताना अचानक इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्यात दोनजण जखमी झाले. फरीद खान (४५) या मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा अब्दुल शेख या मजुरावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डाव्या हाताला, हनुवटी आणि गालाला दुखापत झाली आहे.