जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

By Admin | Published: July 26, 2015 03:31 AM2015-07-26T03:31:13+5:302015-07-26T03:31:13+5:30

पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी जायचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या मनात धडकी भरते. मात्र खाकी वर्दीवाल्यांच्या काहीशा जड प्रतिमेला पोलीस निरीक्षक अर्जुन केंगार यांचा अपवाद होता.

Death of a live police officer | जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

- जमीर काझी,  मुंबई
पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी जायचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या मनात धडकी भरते. मात्र खाकी वर्दीवाल्यांच्या काहीशा जड प्रतिमेला पोलीस निरीक्षक अर्जुन केंगार यांचा अपवाद होता. मात्र आता त्यांच्याकडून नावासोबत भाऊ, राव, भाई ही आपुलकी दर्शवणारी हाक पुन्हा कधीच ऐकू येणार नाही; या जाणिवेने प्रत्येकाचे डोळे भरून येत आहेत.
वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अर्जुन केंगार यांचा शुक्रवारी दुपारी मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळ अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासमवेत हवालदार सतीश शिंदे यांचेही निधन झाले. केंगार यांच्या पार्थिव देहावर सातारा जिल्ह्यातील जाभूळणी (ता. म्हसवड) या मूळ गावी अंत्यसस्कार करण्यात आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेत पोलीस हवालदार म्हणून भरती झालेले केंगार हे १९९५ साली खात्यांतर्गत परीक्षा देत पीएसआय झाले. ठाण्यात फिर्याद घेऊन येणाऱ्याशी सौजन्याने कसे वागावे याचा वस्तुपाठ वरिष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांना त्यांच्याकडून मिळत होता. वृद्ध नागरिक असो की एखादा सहकारी अधिकारी असो, प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत ते मदत करण्यास पुढाकार घेत असत.
शुक्रवारी नाइट ड्युटी केल्यानंतर दोन दिवसांची रजा घेऊन वाई येथे घेतलेल्या फ्लॅटमध्ये साहित्य ठेवण्यासाठी जेरी या चालकमित्राला सोबत घेऊन ते निघाले. मात्र सेफ्टी बेल्ट बांधण्यात दाखविलेल्या बेफिकिरीने जिंदादिल अधिकाऱ्याला अकाली काळाच्या पडद्याआड नेले.

सौजन्याचा वस्तुपाठ
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेत पोलिस हवालदार म्हणून भरती झालेल्या केंगार हे १९९५ साली खात्याअंतर्गत परिक्षा देत पीएसआय झाले. ठाण्यात येणाऱ्याशी सौजन्याने कसे वागावे याचा वस्तुपाठ वरिष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांना त्यांच्याकडून मिळत होता. वृद्ध असो की सहकारी अधिकारी असो, ते प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत.

Web Title: Death of a live police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.