Join us

धारावीत अन्न वाटप करणाऱ्या पालिकेच्या अधिका-याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 1:51 AM

अधिका-याला आज सायंकाळी त्यांच्या गोराई भागातील निवासस्थानावरून अँम्ब्युलन्सने कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता, हॉस्पिटलच्या दारातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई : धारावीत अन्नवाटप करणारा पालिकेचा कर निर्धारण व संकलन खात्यातील ५१ वर्षीय निरीक्षकाचा बुधवारी मृत्यू झाला. या अधिका-याला आज सायंकाळी त्यांच्या गोराई भागातील निवासस्थानावरून अँम्ब्युलन्सने कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता, हॉस्पिटलच्या दारातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सत्तेच्या सरपाटात कोरोनाग्रस्तांना सेवा देणारे पालिकेचे असे कर्तव्यदक्ष अधिकारी आज मृत्यूच्या वाटेवर आहेत. पालिकेने आता कोरोनाग्रस्त भागाला सेवा पुरवण्यासाठी रोबोटचाच वापर केला पाहिजे असे खडेबोल सूत्रांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहेत.दरम्यान पालिकेच्या अनास्थामुळे या अधिकाºयाचा बळी गेल्याची टिका दि म्युनसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी आपल्या पत्रकात केली आहे.त्यामुळे कोरोनाबाधीतांची सेवा करणाºया आणि त्यांच्या संपर्कात येणाºया सर्व कामगार,कर्मचारी व अधिकाऱ्यांची तातडीने वैद्यकीय चाचणी करण्यात यावी अशी मागणी वारंवार युनियनने केली पालिका प्रशासनाला केली आहे.मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युनियनने केला.या कर्तबगार अधिकाºयांच्या निधनाने या खात्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गात असंतोष व चीड निर्माण झाल्याचे युनियनने आपल्या पत्रकात म्हंटले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या