‘मातोश्री’ बंगल्यात बांधकाम मजुराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:20 PM2023-05-20T12:20:54+5:302023-05-20T12:21:43+5:30

याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा  दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Death of a construction worker in 'Matoshree' bungalow | ‘मातोश्री’ बंगल्यात बांधकाम मजुराचा मृत्यू

‘मातोश्री’ बंगल्यात बांधकाम मजुराचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी उंचावरून  पडून शिवराम वर्मा या ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा  दाखल केला असून, तपास सुरू आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हा प्रकार घडला. मातोश्रीच्या साइटवर काम करताना हा मजूर उंचावरून खाली पडला. त्यात तो जबर जखमी झाला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारांदरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. 

खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी कंत्राटदाराच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात नेमका कसा घडला याप्रकरणी सध्या पोलिस तपास करीत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींचेही जबाब नोंदविण्यात येत आहेत. कंत्राटदाराने काम करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा उपाय केले होते का याचीही चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या घटनेची अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
 

Web Title: Death of a construction worker in 'Matoshree' bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.