म्युकरमायकोसिसमुळे केईएममध्ये एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:49+5:302021-05-19T04:06:49+5:30
६० जणांवर उपचार सुरू; सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्युकरमायकोसिसमुळे परळ येथील केईएम रुग्णालयात ३६ ...
६० जणांवर उपचार सुरू; सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्युकरमायकोसिसमुळे परळ येथील केईएम रुग्णालयात ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महानगर पालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केईएम रुग्णालयात या आजाराच्या ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर नायर, शीव, कूपर रुग्णालयातही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोविड उपचारादरम्यान स्टेराॅइड्सचा अतिवापर केल्याने म्युकरमायकोसिसचा त्रास होतो. त्यातून डोळ्यांत काळी बुरशी तयार होते. हा संसर्ग नाक, मेंदूपर्यंत पोहोचला की जीवावर बेतण्याची शक्यता असते. प्रसंगी ऑपरेशन करावे लागते. या आजाराचे रुग्ण वाढत असून सध्या एकूण १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिकेकडून यासाठी स्पेशल म्युकरमायकोसिस वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे.
.......................................