पोलीस ठाण्याच्या आवारात एकाचा मृत्यू

By admin | Published: July 2, 2014 10:56 PM2014-07-02T22:56:41+5:302014-07-02T23:19:30+5:30

खोपोली पोलिस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. दोनवत येथील सुरेश जाधव या व्यक्तीला चक्कर येवून मृत्यू झाला असून ही घटना संवेदनशील मानली जात आहे

Death in one of the premises of the police station | पोलीस ठाण्याच्या आवारात एकाचा मृत्यू

पोलीस ठाण्याच्या आवारात एकाचा मृत्यू

Next

खालापूर : खोपोली पोलिस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. दोनवत येथील सुरेश जाधव या व्यक्तीला चक्कर येवून मृत्यू झाला असून ही घटना संवेदनशील मानली जात आहे. जाधव यांचे शवविच्छेदन खालापूर येथे न करता मुंबईतील जे जे रु ग्णालयात करण्यात आले आहे .
खालापूर तालुक्याच्या दोनवत येथे राहणारे सुरेश बाबाजी जाधव (५५) यांची मुलगी कल्पना हिचे लग्न शहरातील दिलीप चौधरी यांच्या सोबत झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी ती इस्माइल युसुफ खान या तरु णासोबत पळून गेल्याची तक्र ार पोलिसठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर कल्पना आपले वडील सुरेश बाबाजी जाधव यांच्या दोनवत येथील राहत्या घरी परत आली. याबाबत जबाबासाठी कल्पना पोलीस ठाण्यात आली असताना तिचे वडील सुरेश जाधव हे देखील पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी कल्पनाने आपल्याला वडिलांकडे राहावयाचे नसल्याचे जबाबात लिहून दिल्यानंतर हे सर्वजण बाहेर पडत असताना सुरेश जाधव हे चक्कर येवून पोलिस ठाण्याच्या आवारात कोसळले. यावेळी त्यांचा मुलगा विष्णू जाधव , मित्र सचिन फराट हे उपस्थित होते. सुरेश जाधव यांना तत्काळ पालिका रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना शहरातील नर्सिंग होममध्ये दाखल केले असता मृत घोषित केले . दरम्यान ही घटना पोलिस ठाण्याच्या आवारात घडल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खालापूर तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी यांचे समक्ष रीतसर पंचनामा करून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विछेदन न करता मुंबईतील जे जे रु ग्णालयात शवविछेदनसाठी हलविण्यात आले. जे जे रु ग्णालयात तीन डॉक्टर पथकाने शवविच्छेदन करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.(वार्ताहर)

Web Title: Death in one of the premises of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.