हृदयविकाराचा झटक्याने पोलिसाचा मृत्यू
By admin | Published: September 18, 2016 09:25 PM2016-09-18T21:25:04+5:302016-09-18T21:25:04+5:30
बंदोबस्तावेळी हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे
Next
>मनिषा म्हात्रे/ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.18- बंदोबस्तावेळी हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. टेकवडे यांच्यावर त्यांच्या पुण्यातील गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भांडुप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले टेकवडे हे ९ सप्टेंबरच्या रात्री लालबहादुर शास्त्री मार्गावरील भांडुप स्थानक रोड सिग्नलवर कर्तव्य बजावत होते. रात्री अकराच्या सुमारास चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. अन्य सहकारी पोलिसांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला देत उपचारांसाठी मुलूंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. गेले आठ दिवस येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास डॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.