रेल्वे पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 05:47 PM2020-05-30T17:47:53+5:302020-05-30T17:48:17+5:30
अंधेरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (वय ५६) यांचे शनिवारी सकाळी सायन रुग्णलयात निधन झाले.
मुंबई : अंधेरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (वय ५६) यांचे शनिवारी सकाळी सायन रुग्णलयात निधन झाले. मागील काही दिवसांपासून रुगालयात आजाराशी झुंज देत होते.
ट्रॉम्बे येथे राहणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक यांची तब्येत खालावल्याने १९ मेपासून कर्तव्यावर नव्हते. तब्येत बरी होत नसल्याने ते २५ मेपासून सायन रुग्णालयात दाखल होते. त्यांना बाकीचे देखील काही व्याधी होत्या, मृत्यू दाखला अजून आला नाही, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्या सहकार्यांनी सांगितले कि, त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते.
अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात ५ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबई तसेच मुंबईच्या बाहेर बंदोबस्त तसेच स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याची रेल्वे पोलिसांवर जबाबदारी असल्यामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची चर्चा रेल्वे पोलीस दलात सुरू आहे.