माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना जीवे मारण्याच्या धमक्या! वेगवेगळ्या फेसबुक प्रोफाईलमार्फत आक्षेपार्ह मेसेज

By गौरी टेंबकर | Published: April 11, 2023 02:42 PM2023-04-11T14:42:57+5:302023-04-11T14:43:10+5:30

याप्रकरणी बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल.

Death threats to former corporator Shiva Shetty! Offensive messages through different Facebook profiles - case filed with Borivali Police | माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना जीवे मारण्याच्या धमक्या! वेगवेगळ्या फेसबुक प्रोफाईलमार्फत आक्षेपार्ह मेसेज

माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना जीवे मारण्याच्या धमक्या! वेगवेगळ्या फेसबुक प्रोफाईलमार्फत आक्षेपार्ह मेसेज

googlenewsNext

मुंबई: 'गोराई के माजी नगरसेवक बहुत जल्दी विकेट, बच के रेहना, देशी कट्टा आ गया है' अशा आशयाचे मेसेज गोराईचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यानुसार याची तक्रार त्यांनी बोरिवली पोलिसांना दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेट्टी हे बोरिवलीतील प्रभाग क्रमांक ९ चे माजी नगरसेवक असून त्यांनी २०१२ ते २०२२ पर्यंत हे पूर्व पद भूषवले आहे. त्यांनी फेसबुक वर शिवा शेट्टी या नावाने प्रोफाइल तयार केली असून १८ एप्रिल, २०२२ रोजी साडे बाराच्या सुमारास फेसबुक पोस्ट पाहत असताना ललित सावंत, संदीप शाईन नावाने प्रोफाइल बनवत शेट्टी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पोस्ट करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी धर्मेश जाधव आणि पूजा मकवाना नामक प्रोफाइल वरून पुन्हा तोच प्रकार करण्यात आला.

तर नुकतेच २९ मार्च ,२०२३ पासून फुनसुख वांगडू (छोटे) वरून देखील अपमानित करण्यात सुरुवात झाली. तर ७ एप्रिल रोजी शेट्टी यांच्या फेसबुक पेजवर ' गोराई के माजी नगरसेवक बहुत जल्दी विकेट बचके रहना, अशी पोस्ट टाकत त्यात चाकू आणि कुऱ्हाडचे इमोजी वापरले गेले. तर ८ एप्रिल रोजी फुनसुख वांगडू (छोटे) या फेसबुक प्रोफाईल वरून कालिया और रावण को मारने के लिए देशी कट्टा आ गया है अशी पोस्ट टाकत चाकूची इमोजी वापरण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून हे प्रकार सुरू आहेत पण मी दुर्लक्ष केले, तसेच संबंधितांना काही उत्तरे दिले नाही पण आता हे प्रकार अधिकच वाढायला लागल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असे शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ५०१, ५०४, ५०६(२) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी) अंतर्गत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Web Title: Death threats to former corporator Shiva Shetty! Offensive messages through different Facebook profiles - case filed with Borivali Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.