ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना
ठाणो : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लिफ्ट बंद असल्यामुळे तीन मजले चढून गेलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी संजय खैरनार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारादरम्यान ज्युपिटर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तिस:या मजल्यावरील नगरविकास विभागातील मिटिंगसाठी खैरनार आले होते. पण, येथील लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना तीन मजले चढून जावे लागले. वर जाताच त्यांना उलटय़ा होऊन घाम सुटला. यामुळे त्यांना त्वरित सिव्हिलमध्ये हलवणो आवश्यक असल्यामुळे इमारतीवरून त्यांना खाली उतरवणो अवघड झाले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायांनी खुर्चीत बसवून त्यांना इमारतीखाली आणले. त्यानंतर, त्यांना कसेबसे सिव्हिलमध्ये दाखल केले.
तेथे काही उपचार झाल्यानंतर
त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे उघड होताच ज्युपिटरमध्ये वेळीच हलवणो गरजेचे होते. पण, तेथेही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.
यात बराच वेळ गेल्यानंतर शहापूर ग्रामीण रुग्णालयातून आलेल्या रुग्णवाहिकेने त्यांना ज्युपिटरमध्ये हलवले. परंतु, तेथील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
च्जिल्हाधिकारी कार्यालयातील
लिफ्ट सुरू असत्या तर त्यांना तीन मजले चढून जावे लागले नसते आणि त्यांना दम लागून हृदयविकाराचा झटका आला नसता, असा तर्क लावला जात आहे.
च्येथील तिन्हीपैकी केवळ दोन
लिफ्ट सुरू आहेत. पण, त्या कोणत्याही क्षणी बंद पडतात. एक वर्षापासून या समस्येमुळे कित्येक वेळा लोकांना लिफ्टमध्ये अडकून राहावे लागले आहे.
च्कोणाचे लक्ष गेले तर ते मदत करून लिफ्टला ठोकठाक करून कसेबसे खाली आणण्याचा प्रय} करतात. परंतु, या गंभीर समस्येचे गांभीर्य बांधकाम विभागाला नसल्याचा आरोप अधिकारी-कर्मचारी करतात.