Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा पोचला १० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 08:42 PM2019-07-16T20:42:00+5:302019-07-16T20:43:17+5:30
अद्याप ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत कोसळल्याची घटना आज घडली. यामध्ये ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत.
जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या साबिया निसार शेख (६०), जावेद इस्माईल (३४), अब्दुल सत्तार कालू शेख (५५), मुजमिल मन्सूर सलमानी (१५), सायरा रिहान शेख (२०), अरहन शेहजाद (४०), कश्यप्पा अमिराजान (१३), सना सलमानी (२५), झुबेर मन्सूर सलमानी (२०), इब्राहिम (दीड) यांचा मृत्यू झाला आहे तर हबीब रुग्णालयातील एक अनोळखी इसमावर उपचार सुरु आहे. तसेच जे. जे. रुग्णालयात फिरोज नाझिर सलमानी (४५), आयशा शेख (३), झीनत रहेमान (३०), अब्दुल रहमान (३), नावेद सलमानी (३०), इम्रान हुसेन कल्वानिया (३०), स्लम अब्दुल शेख (४५), साजिदा शहजाद जरीवाला (५८) या जखमींवर उपचार सुरु आहेत. अद्याप ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.