फोर्टच्या दुर्घटनाग्रस्त भानुशाली इमारतीतील मृत रहिवाशांचा आकडा पोहोचला १० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:26 AM2020-07-18T06:26:48+5:302020-07-18T06:27:10+5:30
भानुशाली या तळमजला अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीच्या एका बाजूचा भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळला.
मुंबई : फोर्ट येथील भानुशाली या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा शुक्रवारी १० झाला आहे. कुसुम पद्मलाल गुप्ता (४५), ज्योत्स्ना पद्मलाल गुप्ता (७०), पद्मलाल मेवालाल गुप्ता (५०), मनिबेन नानजी फारिया (६५), शैलेश भालचंद्र कानडू (१७), ललित चौरासिया (३५), रिंकू चौरासिया (२५), कल्पेश फारिया (३२) अशी ८ मृतांची नावे असून, दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर नेहा गुप्ता आणि भालचंद्र कानडू असे दोघे जखमी झाले. यातील भालचंद्र किरकोळ जखमी झाले असून नेहा यांची प्रकृती चिंताजनक आहे.
भानुशाली या तळमजला अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीच्या एका बाजूचा भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळला. गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारच्या दिवसभरातील शोधकार्यानंतर हा आकडा दहा झाला.
मुंबईत पावसाची संततधार
मुंबईत पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. पावसाचा
जोर असतानाच १७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.