मुंबई : राणीबागेतील दोन पेंग्विनचा मृत्यू झाला असून, वाघाचा एक छावा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या वृत्तामुळे उभ्या मुंबईत खळबळ माजली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाºयांना तत्काळ निलंबित केले आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्यासाठी आयुक्तांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. मात्र, प्राणीचोरीच्या घटनेने पालिका प्रशासनाची पुरती नाचक्की झाली आहे. पेंग्विन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पेंग्विनच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. पेंग्विनच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समोर येईल. याशिवाय कोणतीही माहिती देण्यास प्रशासनाने नकार दिला )प्रशासनाने नकार दिला आहे. पालिकेच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पेंग्विनची काळजी घेणाºया कर्मचाºयांनी कक्षाचा दरवाजाचे उघडले, तेव्हा कुलूप तुटलेले होते. यावरून कक्षात कुणीतरी शिरण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता त्या अधिकाºयाने व्यक्त केली आहे.
वाचकहो, थोडा धक्का बसला ना, बातमी वाचून. नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली...