मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली रोडवरील इमारतीत लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास येथील चौदा मजल्यांच्या धर्मक्षेत्र या इमारत क्रमांक तीनच्या तळमजल्यावर आग लागली. यात जया रमेश घरसिया (५५) या महिलेचा मृत्यू झाला, तर लक्ष्मी यरोला ही महिला जखमी झाली.कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात लक्ष्मी यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिनांसह आगीवर नियंत्रण मिळविले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
बोरीवलीत लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 06:27 IST