निष्काळजी उबेर चालकामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:42 AM2018-06-16T06:42:08+5:302018-06-16T06:42:08+5:30

उबेरने गोरेगाव येथून ऐरोलीच्या दिशेने निघालेल्या महिला प्रवाशाचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी विक्रोळीत घडली. तंजीला मुजंलीम शेख (३६) असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे.

Death of women passenger due to negligent Uber driver | निष्काळजी उबेर चालकामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू

निष्काळजी उबेर चालकामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू

Next

मुंबई - उबेरने गोरेगाव येथून ऐरोलीच्या दिशेने निघालेल्या महिला प्रवाशाचा चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी विक्रोळीत घडली. तंजीला मुजंलीम शेख (३६) असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी उबेर चालक इंद्रजीत सिंग गुरुदयाल सिंग (५९) याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिंगदेखील या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख या गोरेगाव येथील रहिवासी आहेत. गुरुवारी दुपारी त्यांनी ऐरोलीला जाण्यासाठी त्यांनी उबेर बुक केली. सिंगच्या उबेरने त्या पूर्व द्रुतगती मार्गावरुन ऐरोलीकडे निघाल्या. दुपारी पावणे तीनच्या सुमारास विक्रोळीतून जात असताना, सिंग याचे भरधाव वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडे उभ्या असलेल्या मोटार डंपरवर धडकली. या भीषण धडकेत महिला प्रवासी जागीच ठार झाली. तर सिंग जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे विक्रोळी पोलिसांनी सांगितले.
भांडुपमध्ये भरधाव रिक्षाचा बळी
भांडुप एलबीएस रोड येथून पायी निघालेल्या विनायक केशवराम गुहे यांना रिक्षाने (क्र. एमएच ०४, ६३०७) धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Death of women passenger due to negligent Uber driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.