Join us

तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम

By admin | Published: October 19, 2015 2:39 AM

तरुणा आणि तिचा पती धवल कुमार या जोडप्याने सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुकवर दोघांचे अपलोड केलेले छायाचित्र बघून असे चुकूनही कोणी म्हणणार नाही की

डिप्पी वांकाणी,  मुंबईतरुणा आणि तिचा पती धवल कुमार या जोडप्याने सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुकवर दोघांचे अपलोड केलेले छायाचित्र बघून असे चुकूनही कोणी म्हणणार नाही की, या दोघांमध्ये काही बिनसलेले आहे. उलट फेसबुकवरील हे जोडपे सगळ््यांच्या कौतुकाचा विषय ठरले होते. त्यांना फेसबुकवर शेकडो मित्र, चाहते आणि कुटुंबीयांकडून बेस्ट कपलची दाद लाईक्स स्वरूपात मिळाली होती. सोशल मीडियावरील तरुणाच्या अस्तित्वावरून त्या दोघांच्या आयुष्यात काही त्रास असल्याचे दिसत नव्हते. २८ वर्षांची तरुणा १७ आॅक्टोबर रोजी वरळीतील सुखवस्तू सुखदा टॉवर्सच्या दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंटवरून गूढ निर्माण व्हावे, अशा अवस्थेत पडली. अपार्टमेंटच्या पहारेकऱ्याने कुंपणाच्या भिंतीच्या आता धाडकन काहीतरी पडल्याचे ऐकले, तेव्हा तरुणा रक्ताच्या थारोळ््यात पडली होती. तिचा पती धवल कुमार व त्याच्या दोन मित्रांनी बेडरूमचे दार तोडले, तेव्हा ते आतून बंद केलेले होते. वरळी पोलीस तरुणाने आत्महत्या केली की तिचा अपघाती मृत्यू आहे, याची चौकशी करीत आहेत. तरुणा आणि धवल कुमार यांचा विवाह २८ सप्टेंबर २०१४ रोजी झाला होता. तेव्हापासून हे दोघे फेसबुकवर त्यांच्या आनंदी जीवनातील छायाचित्रे अपलोड करीत होते व या दोघांचे फेसबुकवर ३१ म्युच्युअल फ्रेंडस् होते. तरुणाची बहीण सविता धिंग्रा बब्बर ही इंग्लडमध्ये वास्तव्यास आहे. ती फेसबुकवरील तरुणाच्या पोस्टची खूप मोठी चाहती होती व धवलसोबतच्या तिच्या छायाचित्रांना ती न चुकता लाईक करून त्यावर काही भाष्यही करायची. ‘निर्दोष, उत्कृष्ट, सुंदर’, असे शब्द सविताने या जोडप्याच्या छायाचित्रांवरील कमेंटस्साठी वापरले होते. याला प्रतिसाद म्हणून तरुणानेही फेसबुकवर सविताने तिचा पती आणि मुलासह अपलोड केलेल्या छायाचित्रांनाही लाईक केले होते, त्यांच्यावर काही भाष्यही केले होते.