कांदिवलीतील घटना मुंबई: कांदिवली परिसरात एका खेळाच्या मैदानात धावत असताना एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठवला आहे.दीपककुमार चौधरी असे या मृत तरु णाचे नाव असून, तो कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या स्पोर्ट्स आॅथोरिटी आॅफ इंडिया या मैदानात धावत होता. धावता धावता अचानक तो चक्कर येऊन पडला. त्या वेळी त्याच्या आसपास त्याला उठविण्यासाठी कोणीही नव्हते. त्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समतानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड यांनी दिली. चौधरी पडल्यानंतर त्याच्या नकातोंडातून रक्त येऊ लागले, तसेच डोळ््यालाही दुखापत झाली. याप्रकरणी त्याचे वडील आणि भावाने कोणा विरोधातही तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून, चौधरीचा मृतदेह भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
मैदानात धावताना तरु णाचा मृत्यू
By admin | Published: February 19, 2015 2:41 AM