मुंबई : युनाईटेड ब्रेव्हरेजेस लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी देबब्रता मुखर्जी यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या (एबीसी) अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. २०२१-२२ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे तर, सकाळ समूहाचे प्रताप पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उद्योग जगतात २७ वर्षांहून अधिक काळ विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिलेले देबब्रता मुखर्जी सध्या युनाईटेड ब्रेव्हरेज कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी आहेत. किंगफिशर, अल्ट्रा, हेनिकेन अशा स्थानिक आणि आंतराष्ट्रीय पातळींवरील ब्रँडस्च्या संचालन, व्यवस्थापनाची जबाबदारी ते कुशलपणे पार पाडत आहेत. व्यवस्थापन, विपणन, व्यावसायिक धोरण आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात देबब्रता मुखर्जी यांचा अनुभव आणि कौशल्य वादातीत आहे.
युनिलिव्हर इंडिया कंपनीच्या माध्यमातून देबब्रता मुखर्जी यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली. येथील चार वर्षांच्या कारकिर्दीनंतर १९८८ साली ते कोकाकोला कंपनीत रूजू झाले. इथे विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले. कोको कोला कंपनीच्या भारतातील जबाबदारीसोबतच कोरिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. कंपनीच्या दक्षिण-पश्चिम आशियायी क्षेत्राचे उपाध्यक्षपद सांभाळल्यानंतर २०१८ मध्ये मुखर्जी हे हिंदुस्थान टाईम्स् ग्रुपमध्ये सामील झाले. हिंदुस्थान टाइम्सचे कार्यकारी संचालक पदावर त्यांनी काम पाहिले. त्यानंतर २०१९ मध्ये मुखर्जी युनाईटेड ब्रेव्हरेजेसमध्ये दाखल झाले.
आनंद बाजारपत्रिकेत स्वतंत्र संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. २०११ पासून मुखर्जी हे एबीसीच्या काैन्सिल ऑफ मॅनेजमेंटशी जोडले गेले आहेत. काैन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
२०२१-२२ साठी एबीसी व्यवस्थापन समिती सदस्य पुढीलप्रमाणे -
जाहिरातदारांचे प्रतिनिधी
१) अध्यक्ष - देबब्रता मुखर्जी, युनाईटेड ब्रेव्हरेज लिमिटेड
२) करूणेश बजाज, आयटीसी लिमिटेड
३) अनिरूद्ध हल्दार, टीव्हीएस मोटार कंपनी लि
४) शशांक श्रीवास्तव, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड
प्रकाशकांचे प्रतिनिधी
१) उपाध्यक्ष - प्रताप पवार - सकाळ पेपर्स प्राय. लिमिटेड
२) मानद सचिव - रियाध मॅथ्यू - मल्याळम मनोरमा कं. लिमिटेड
३) देवेंद्र दर्डा - लोकमत मीडिया प्राय. लिमिटेड
४) हारमुसजी एन.कामा, द बाॅम्बे समाचार प्राय. लिमिटेड
५) शैलेश गुप्ता - जागरण प्रकाशन लिमिटेड
६) प्रवीण सोमेश्वर- एच. टी. मीडिया लिमिटेड
७) मोहित जैन - बेनेट, कोलमन ॲन्ड कंपनी लिमिटेड
८ ) ध्रुव मुखर्जी - एबीपी प्रायव्हेट लिमिटेड
जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी
१) मानद खजिनदार - विक्रम सखुजा - मॅडिसन कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड
२) शशीधर सिन्हा, आयपीजी मीडिया ब्रॅडस, मीडिया ब्रँडस् प्राय. लिमिटेड
३) श्रीनिवासन के. स्वामी, आर. के. स्वामी बीबीडीओ प्राय. लिमिटेड
४) आशिष भसिन, डेंत्सु एजिस नेटवर्क कम्युनिकेशनस् इंडिया प्रा.लि.
सरचिटणीस - एच. बी. मसानी