Join us

समन्वय समितीच्या सदस्यांवरून वाद

By admin | Published: February 20, 2015 1:22 AM

भाजपा व शिवसेना युतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक मंगळवार, २४ फेब्रुवारीस होणार असली तरी अजून सदस्यांच्या निश्चितीवरून वाद सुरूच आहे.

मुंबई : भाजपा व शिवसेना युतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक मंगळवार, २४ फेब्रुवारीस होणार असली तरी अजून सदस्यांच्या निश्चितीवरून वाद सुरूच आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीमधून अंग काढून घेतले आहे.भाजपा व शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश पक्का आहे. या समितीमध्ये एकनाथ खडसे यांचा समावेश केला जाणार नाही. शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. मात्र रामदास कदम यांना समितीपासून दूर ठेवले जाणार असल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समितीचे सदस्य नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस हेही समितीच्या कामकाजापासून दूर राहणार असल्याचे कळते. शिवसेनेच्या सदस्यांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत. मित्रपक्षांची२१ फेब्रुवारीला बैठकराज्यात महायुतीचे सरकार येण्यात सर्व घटकपक्षांचा वाटा आहे. मात्र समन्वय समितीत घटक पक्षांना डावलले जात असल्याने येत्या २१ फेब्रुवारीस घटक पक्षांची बैठक बोलावली असल्याचे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी सांगितले. या बैठकीस स्वाभिमानीचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपाचे महादेव जानकर व रिपाइंचे आठवले उपस्थित राहतील. सरकारमध्ये व समन्वय समितीत मित्रपक्षांना तत्काळ स्थान देण्याची मागणी या बैठकीनंतर भाजपा-शिवसेनेकडे करण्यात येणार आहे.