Join us  

डेब्रिज घोटाळ्यात आता उपायुक्तांची चौकशी

By admin | Published: May 28, 2016 1:38 AM

रस्ते आणि नालेसफाईतील घोटाळा चर्चेत असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दीडशे कोटी रुपयांच्या डेब्रिज घोटळ्याप्रकरणात उपायुक्त दर्जाचा

मुंबई : रस्ते आणि नालेसफाईतील घोटाळा चर्चेत असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दीडशे कोटी रुपयांच्या डेब्रिज घोटळ्याप्रकरणात उपायुक्त दर्जाचा अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे़ समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांंनी हरकतीच्या मुद्दाद्वारे या घोटाळ्याकडे लक्ष वेधले़ रस्त्याच्याकडेला असलेला गाळ आणि डेब्रिज काढण्याच्या कामाची निविदा दोन वर्षांपूर्वी मागविण्यात आली होती . या अंतर्गत दीडशे कोटी रुपये पालिका मोजणार होती़ मात्र ठेकेदारांनी काम न करताच जादा पेमेंट मिळवून आपले खिसे भरले. दीडशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे का, ही चौकशी कोणत्या टप्यात आहे? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला़ यावर उत्तर देताना याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला सांगितले़ (प्रतिनिधी)असा झाला डेब्रिज घोटाळारस्त्याच्या कडेला असलेला गाळ व डेब्रिज उचलण्यासाठी ७३० दिवसांचा कामाचा कालावधी होता़ हे काम ठेकेदारांनी प्रत्यक्षात केलेच नाही़ तरीही अधिकाऱ्यांच्या संगनमताने या ठेकेदारांनी कामाचा ४० टक्के अधिक मोबदला मिळवला़ तसेच अतिरिक्त पेमेंट नियमित केल्यास नवे काम घेऊ, असे दबावतंत्रही ठेकेदारांनी वापरले होते़ त्यामुळे परिमंडळ पाचचे उपायुक्त भरत मराठे यांनी ठेकेदारांचे पेमेंट नियमित केले होते़