मुंबई- एकही शेतकरी ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभार्थी सापडला नाही. म्हणून कर्जमाफी फसवी आहे याबाबतीत मुख्यमंत्री सत्य काय आहे ते सांगणार का, असा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. बोंड आळी मदत मिळाली नाही ती घोषणाही फसवी आहे. हमीभावाबाबतीत सरकार काही भूमिका घेत नाही.चार वर्षे निर्णय का घेतला नाही. आज बांधावरचा शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहे. ५६ लाखांचा मावेजा देऊ असं सरकार म्हणते. धर्मा पाटील यांचे चिरंजीव सरकारी कार्यालयात फेरफटका मारत आहे इथे असं कळलं की एक टक्का प्रोसेस सुरू झाली नाही.विधानसभा निवडणुकीत यांनी घोषणा दिली होती. शिव छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ... एक साधी जाहिरात यांनी छापली नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्राची मोठी जाहिरात होती. शिवाजी महाराज यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपतींबाबत अपशब्द वापरला जातो तेव्हा शिवसेनेतील लोक, भाजपाचे लोक, मुख्यमंत्री माफी मागत नाही, सत्तेची मस्ती चढली आहे.३७ कोटींची गुंतवणूक झाली, २७ फेब्रुवारीला चुंबकीय महाराष्ट्र म्हणावे लागेल. राज्यात आहे ते उद्योग बाहेर चालले आहेत. इतर राज्यातून उद्योग महाराष्ट्रात यावा म्हणून ३६ लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षभरात बेरोजगारी थांबणार का ? आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी हे सगळे सुरू आहे. ३-४ हजार पोलीस भर्ती आली आहे. आबांच्या काळात १४-१५ हजार संख्या होती. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. १ लाख ७० हजारचा पुरवणी मागण्याचा रेकॉर्ड या सरकारने केला.
कर्जमाफी फसवीच, सरकारचे काऊंटडाऊन सुरू, धनंजय मुंडे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 6:01 PM