लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील सुताराला मालाड पोलिसांनी अटक केली. मात्र त्याचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. ज्यात एका महिलेचादेखील समावेश आहे.
जुलै, २०२० मध्ये व्यवसायाने अकाउंटंट असलेल्या तक्रारदाराला प्रिया शर्मा नामक बँक कर्मचाऱ्याचा फोन आला. तिने त्यांना १२ लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दिले. मात्र यासाठी तिने त्यांना १२ हजार ६०० रुपये एका खात्यात भरण्यास सांगितले. त्यानंतर काहीना काही कारण सांगत २ लाख ८ हजार रुपये त्यांनी खात्यात भरले. मात्र तरीदेखील कर्ज न मिळाल्याने त्यांना संशय आला व त्यांनी या प्रकरणी मालाड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. त्यानुसार मनीष शर्मा नामक सुताराला अटक करत त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.