ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - सिंचन क्षमता वाढवायची आहे, शेतक-यांना कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लोकमत वॉटर समिट 2017 च्या कार्यक्रमात व्यक्त केले. जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज मंगळवार, ११ जुलै रोजी लोकमत वॉटर समिट २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी लोकमतच्या कामचे कौतुक केले. ते म्हणाले लोकमतने महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले, 173 प्रकल्पांना सुधारीत मान्यता दिली आहे. तहान लागल्यावर विहीर खोदून उपयोग नाही, पाऊस चांगला झाला की लोकसहभाग मंदावतो, टँकरमुक्तीसाठी प्रयत्न आहेत, पाणी मुबलक असेल तर कितीही द्या ही भूमिका चुकीची आहे. आपल्याला पाण्याची योग्य बचत करावी लागेल. इस्रायलसारखे पाणी बचातीचे नियोजन करण गरजेचं आहे. लोकांमध्ये साक्षरता यायला हवी, म्हणून अभियान राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी यापुढे पाणी मोजून दिले जाईल. शेतीसाठी 75 टक्के, पिण्यासाठी 15 टक्के, उद्योगांसाठी 10 टक्के पाणी वापरणार. देखभालीसाठी सहापट अधिक पैसे उपलब्ध. सुक्ष्म सिंचनाचा वापर अधिक करण्यावर भर दिला जाईल. यंदा आम्ही विक्रमी सिंचन केलं..41 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा विक्रम केला. देखभाल, दुरुस्तीसाठी पाणीपट्टीचा पैसा वापरला. जलसंपदा खात किती मोठं आहे, याची सर्वांना कल्पना आहे. आम्ही चांगले निर्णय घेतले. अर्थव्यवस्था या खात्यावर अवलंबून आहे
लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला.जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत असे कौतुक गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकमतचे केले. त्यांनी लोकमतने जलयुक्त शिवाराच्या कामचा घेतलेल्या आढाव्याचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे, प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे राम शिंदे म्हणाले.