16 डिसेंबरपासून विमानतळ येथून पुणे व दापोलीसाठी एसटीची बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 05:59 PM2019-12-13T17:59:47+5:302019-12-13T17:59:51+5:30
शिवनेरी (वातानुकूलित) व शिवशाही (वातानुकूलित) बससेवा १६ डिसेंबर २०१९ पासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) येथून पुणे व दापोलीसाठी सुरू होणार आहे.
मुंबई- प्रवांशाच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत शिवनेरी (वातानुकूलित) व शिवशाही (वातानुकूलित) बससेवा १६ डिसेंबर २०१९ पासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) येथून पुणे व दापोलीसाठी सुरू होणार आहे. शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली - स्वारगेटच्या १७ फेऱ्या व शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली - दापोली च्या ३ फेऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ येथून सुरू होत आहेत.
प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) येथे गाड्यांचे वेळापत्रकांचा फलक लावण्यात आला आहे; राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत लोगो असलेला फलक व रा.प. महामंडळाची वेबसाईट व टोल फ्री क्रमांक असलेला फलक लावण्यात आला आहे; ज्या ठिकाणी रा. प. बस चढ-उतारासाठी थांबणार आहेत त्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवाशी थांब्याचा फलक लावण्यात आला आहे. ; प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी २ सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे;