‘संगणक परिचालकांबाबत १० दिवसांत निर्णय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 05:10 AM2018-12-02T05:10:45+5:302018-12-02T05:10:48+5:30

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत १० दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

'Decision about computer operators in 10 days' | ‘संगणक परिचालकांबाबत १० दिवसांत निर्णय’

‘संगणक परिचालकांबाबत १० दिवसांत निर्णय’

googlenewsNext

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत १० दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेले संगणक परिचालकांचे आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले.
संघटनेच्या शिष्टमंडळासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी आयटी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय धोरणात्मक असून, येत्या १० दिवसांत बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या आश्वासनानंतर शनिवारी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने सांगितले.

Web Title: 'Decision about computer operators in 10 days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.