विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय, पुनर्मूल्यांकन, पुनर्परीक्षाचे परीक्षा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:06 AM2018-04-06T05:06:54+5:302018-04-06T05:06:54+5:30
कर्जत येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे यादवराव तासगावकर अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची छायाप्रत व पुनर्परीक्षा देणा-या (रिपीटर) विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्वीकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.
मुंबई - कर्जत येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे यादवराव तासगावकर अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची छायाप्रत व पुनर्परीक्षा देणा-या (रिपीटर) विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी कॉलेजमध्ये स्वीकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सेमिस्टर १, २ , ७ व ८ चे परीक्षा अर्ज कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
हे अर्ज १६ एप्रिल २०१८ पर्यंत स्वीकारले जातील. तशा स्वरूपाच्या सूचना संबंधित महाविद्यालयाला देण्यात आलेल्या आहेत. तासगावकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ वाºयावर सोडणार नाही तसेच जबाबदारीही झटकणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.
कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात सदर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क निर्माण करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी मदत करण्याचे मान्य केले आहे. तरी विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, विहित मुदतीत अर्ज सादर करण्यात यावेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे अर्ज सादर करावेत.