गर्दीच्या वेळी वकिलांना लाेकल प्रवासास परवानगीचा निर्णय लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:35+5:302020-12-02T04:08:35+5:30

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उच्च न्यायालयांसह कनिष्ठ न्यायालयांचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाल्याने गर्दीच्या ...

The decision to allow lawyers to travel to the lake during rush hour is imminent | गर्दीच्या वेळी वकिलांना लाेकल प्रवासास परवानगीचा निर्णय लवकरच

गर्दीच्या वेळी वकिलांना लाेकल प्रवासास परवानगीचा निर्णय लवकरच

Next

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उच्च न्यायालयांसह कनिष्ठ न्यायालयांचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाल्याने गर्दीच्या वेळेत वकिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यायची की नाही, याबाबत या आठवड्याच्या अखेरीस निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

वकील व त्यांच्या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या वेळेत प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाल्याने वकिलांना न्यायालयात सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यासाठी गर्दीच्या वेळेत लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती ॲड. श्याम देवानी यांनी न्यायालयाला केली. त्यावर महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी याबाबत संबंधित भागधारकांबरोबर एक- दोन दिवसांत बैठक घेऊन आठवड्याच्या अखेरीस निर्णय घेऊ, अशी माहिती न्यायालयाला दिली.

* पुढील सुनावणी ९ डिसेंबरला

न्यायालयाने कुंभकोणी यांचे म्हणणे मान्य करत या याचिकांवरील पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवली. तोपर्यंत वकिलांना लोकलमधून जाण्यासाठी आधी जी सवलत देण्यात आली होती, ती न्यायालयाने कायम ठेवली.

Web Title: The decision to allow lawyers to travel to the lake during rush hour is imminent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.