‘डेमू ट्रेन’ रद्द करण्याचा निर्णय

By admin | Published: April 24, 2016 03:09 AM2016-04-24T03:09:05+5:302016-04-24T03:09:05+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोकणातले असूनदेखील कोकण मार्गावर उन्हाळ््यात धावणाऱ्या गाड्यांच्या प्रतीक्षायादीने कोकणवासी नाराज झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील ‘डेमू ट्रेन’ पुन्हा कोकण

Decision to cancel 'DEMU train' | ‘डेमू ट्रेन’ रद्द करण्याचा निर्णय

‘डेमू ट्रेन’ रद्द करण्याचा निर्णय

Next

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोकणातले असूनदेखील कोकण मार्गावर उन्हाळ््यात धावणाऱ्या गाड्यांच्या प्रतीक्षायादीने कोकणवासी नाराज झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील ‘डेमू ट्रेन’ पुन्हा कोकण मार्गावर सुरू होईल, अशी आशा असताना मात्र, रेल्वे प्रशासनाने कोकणवासियांचा अपेक्षाभंग केला आहे. एकीकडे देशभरात विशेष गाड्यांचे नियोजन असताना गणेशोत्सवात कोकणवासियांच्या पसंतीस उतरलेली ‘डेमू ट्रेन’ रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, यातून कोकणवासियांची उपेक्षा होत असल्याचे उघड झाले आहे.
उन्हाळ््यात कोकण रेल्वेमार्गावर प्रवासी संख्या लक्षात घेऊन विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे आता ‘डेमू ट्रेन’ची आवश्यकता नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. प्रवासी संख्या, देखभाल अशी कारणे पुढे करत, मध्य रेल्वेने या निर्णयप्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या भरल्या असल्याने या काळात ‘डेमू ट्रेन’ फायदेशीर ठरली असती, परंतु ही ट्रेन मिरजेला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Decision to cancel 'DEMU train'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.