मुंबई : लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सामान्यांसाठी सुरू केल्यानंतर मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याचा आढावा घेऊन रुग्णसंख्या कमी असल्यास चर्चा करून मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. २२ फेब्रुवारीआधी निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेने मुंबई विद्यापीठाला कळवले आहे.राज्यात सोमवारपासून महाविद्यालये सुरू होत असली तरी मुंबई महानगर प्रदेशात महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार-पुढील आठवड्यात मुंबईतील बाधित रुग्णसंख्येत वाढ अथवा घट आहे का? याचा आढावा पालिका घेईल. रुग्णसंख्याकमी असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होईल. तशी माहिती २२ फेब्रुवारीपूर्वी कळविण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांना पत्राद्वारे कळवले आहे.