Join us

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत कोर्टाचा निर्णय, याचिका निकालात काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 5:51 AM

उच्च न्यायालय : निवडणूक आयोग प्रकरण हाताळेल

मुंबई : पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरून निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. आचारसंहितेचा भंग केल्याच्या कथित आरोपावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे, असे निरीक्षण मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने नोंदविले.

‘निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे आणि आता ते हे प्रकरण हाताळणार आहेत,’ असे म्हणत न्यायालयाने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केलेली जनहित याचिका निकाली काढली. सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनने सांगितले की, चित्रपटाच्या ट्रेलरसाठी २० मार्च रोजी परवानगी दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्रावर बुधवारपर्यंत निर्णय घेऊ. सर्व निकष पूर्ण केले असल्यास चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करू, असे सीबीएफसीने उच्च न्यायालयाला सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाला तरी आचारसंहितेचा भंग होणार नाही,’ असा युक्तिवाद केला गेला होता.

टॅग्स :नरेंद्र मोदीपी. एम. नरेंद्र मोदीन्यायालयभारतीय निवडणूक आयोग