Join us

वाढीव एसी फेऱ्यांबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’, डिसेंबरमध्ये निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:24 AM

प्रवाशांचा प्रवास गारेगार करणारी एकच वातानुकूलित लोकल सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. रेल्वे प्रशासनाला या लोकलच्या फेºया वाढविण्यासंबंधी प्रवाशांकडून सातत्याने सूचना प्राप्त होत आहेत.

महेश चेमटेमुंबई : प्रवाशांचा प्रवास गारेगार करणारी एकच वातानुकूलित लोकल सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. रेल्वे प्रशासनाला या लोकलच्या फेºया वाढविण्यासंबंधी प्रवाशांकडून सातत्याने सूचना प्राप्त होत आहेत. मात्र, या सूचनांसाठी तूर्तास तरी पश्चिम रेल्वेने ‘थांबा आणि पाहा’ हे धोरण अवलंबले आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर दुसरी लोकल आल्यास प्रवाशांच्या सूचना त्वरित अंमलात आणण्यात येणार आहेत. दुसरी एसी लोकल डिसेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे.वातानुकूलित लोकल नाताळच्या मुहूर्तावर चालविण्यात आली. यानंतर या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला आहे. आगामी वातानुकूलित लोकलची चेन्नई येथील फॅक्टरीमध्ये बांधणी होणार आहे. आयसीएफने ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०० बोगींची निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जर्मन तंत्रज्ञानाच्या एलएचबी बोगींची निर्मिती सुरू आहे.> प्रवाशांच्या सर्व सूचना ‘आॅनलाइन’ प्राप्त होत आहेत. यापूर्वीच वातानुकूलित लोकल बांधणीच्या आॅर्डर आयसीएफला देण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये दुसरी वातानुकूलित लोकल येणे अपेक्षित आहे. मार्च २०१९पर्यंत एकूण ८ ते १० वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत धावतील.- मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे